पुणे:- शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर पुण्यात नवी पेठ येथे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. पुण्यात एका कार्यक्रमावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आले होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली.
यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाच देखील झाली. पुण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष संजय मोरे, तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून शहर प्रमुख नाना भानगिरे यावेळी उपस्थितीत होते. तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.