संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

निवृत्ती घेण्याआधी खेळाडूंना बोर्डाला द्यावी लागणार नोटीस; श्रीलंका क्रिकट बोर्डाचे कठोर नियम

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

कोलंबो – गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका क्रिकेटला मैदानातील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील घटनांमुळे मोठे धक्के बसत आहेत. नुकतेच त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंनी कमी वयातच निवृत्ती जाहीर केल्याने सर्वांना धक्का बसला होता. त्यामुळे अखेर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने निवृत्ती घेण्याचा विचार करत असलेल्या खेळाडूंसाठी कठोर नियम लागू केले आहेत.

काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचे दनुष्का गुणतिलका आणि भानुका राजपक्षे यांनी तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. काही खेळाडूंनी बोर्डाचे नियम न पटल्याने, तर काहींनी अमेरिेकेला जाण्याच्या कारणांनी निवृत्ती घेतली. नुकतीच निवृत्ती घेतलेल्या भानुका राजपक्षेने श्रीलंका क्रिकेट बोर्डाने लागू केलेले फिटनेस टेस्टचे नियम न पटल्याने निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे अशाही चर्चा सुरु झाल्या की अन्य काही खेळाडूही निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. पण, असे असतानाच अविष्का फर्नांडोने सोशल मीडियावर त्याच्या निवृत्तीच्या अफवा असल्याचे सांगितले होते. पण, या घटनांमुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कठोर नियम करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय संघातील खेळाडूंना निवृत्तीच्या तीन महिन्यांआधी नोटीस द्यावी लागेल. तसेच विदेशी टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी निवृत्तीनंतर सहा महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. एवढेच नाही, तर लंका प्रीमीयर लीगमध्ये खेळण्यासाठी निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंना 80 टक्के देशांतर्गत क्रिकेट सामने खेळावे लागणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami