संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 02 April 2023

निवृत्त एसटी कर्मचाऱ्याच्या हत्येचे गुढ १वर्षाने उलगडणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सावंतवाडी- सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथील एसटीचे निवृत्त कर्मचारी रमेश ठाकूर यांच्या खुनाची बंद झालेली फाईल पुन्हा एक वर्षांनी उघडण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी स्वतः घटनास्थळाची पाहाणी करून घटनेची माहिती घेतली आहे. तसेच तपास पथकाला अलर्ट करत काही संशयितांची चौकशीही केली आहे.

सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथे राहत असलेले एसटी निवृत्त कर्मचारी रमेश ठाकूर यांचा मृतदेह 8 जुलै 2021 ला त्याच्या राहत्या घरात मिळाला होता.रमेश ठाकूर घरी एकटेच राहत होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञाता कडून त्यांचा खून करण्यात आला होता. ठाकूर यांचा मृतदेह ते राहत असलेल्या घरात न मिळता तो बाजूच्या खोलीत मिळाला होता.ही खोली ते भाड्याने देत असत पण त्या काळात कोण भाड्याने राहत नव्हते त्यामुळे ठाकूरच ही खोली वापरत होते. मारेकऱ्यांनी गळ्यातील चेन चोरून नेली.त्यावेळी चेनचा काही भाग हा तेथेच पडून होता. पण हा खून चोरीच्या उद्देशाने झाला की अन्य कारणाने झाला याचा सुगावा अद्याप पर्यत लागला नाही.

सौरभ अग्रवाल यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रलंबित गुन्ह्याचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी रमेश ठाकूर खुन प्रकरणी घटनास्थळाची पाहाणी केली तत्कालीन अधिकारी कर्मचारी याच्याकडून ही माहिती घेतली आहे.त्यामुळे आता बंद असलेली खुनाची फाईल पुन्हा उघडणार आहे. रमेश ठाकूर यांचा खून झाला होता.त्यानंतर काहि दिवसात दोन वृध्दाना निघुर्ण रित्या मारून त्याचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना सावंतवाडीत घडली होती.या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.त्याचीही पोलीसांकडून या प्रकरणात चौकशी केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या