संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलल्या, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची घोषणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयने नीट पदव्युत्तर पदवीसाठीची परीक्षा स्थगित केली आहे. नीटची परीक्षा १२ मार्च रोजी होणार होती. आता ही परीक्षा सहा ते आठ आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षा मे-जून महिन्यात होण्याची शक्यता असून, परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा देखील लवकरच होऊ शकते.

१२ मार्च रोजी होणारी परीक्षा नीट पीजी काऊन्सेलिंग संपण्यापूर्वीच आयोजित करणयात आली होती. प्राप्त माहितीनुसार, विद्यार्थ्यांशी संबंधित कारणांमुळे मे-जून २०२२ मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, करोनाच्या काळात होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. दरम्यान, नीट-पीजी २०२२ च्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनावणी होणार होती. नीट-पीजी ची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटले की, कोविड महासाथीमुळे १२ मार्च रोजी होणारी परीक्षा नीट पीजी काऊन्सेलिंग संपण्यापूर्वीच आयोजित करणयात आली होती. तसेच याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलले्या याचिकेत असाही दावा करण्यात आला होता की, कोविड-१९ मुळे एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थी त्यांचा इंटर्नशिप कालावधी पूर्ण करू शकले नाहीत. इंटर्नशिप पूर्ण न केलेले विद्यार्थी नीट-पीजी परीक्षेला मुकले असते. त्यामुळे ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात आली होती. अशा स्थितीत जोपर्यंत इंटर्नशिप पूर्ण होत नाही तोपर्यंत परीक्षेची तारीख वाढवावी.अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनानंतर नीट-पीजी काउंसलिंग सुरू झाली होती. मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांची ही काउंसलिंग सुरू आहे. या काउंसलिंगच्या प्रक्रियेला टाळण्यात येत होते. या मुद्यावर निवासी डॉक्टरांनी देशभरात आंदोलन केले होते. दिल्लीतील रुग्णालयात मोठे आंदोलन झाले होते. त्यानंतर काउंसलिंग प्रक्रिया सुरू झाली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami