मुंबई – गेल्या आठवड्यापासून राज्यसभेचे खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि ईडीविरोधात भष्टाचारावावत आघाडी उघडली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणावरुन राऊत ट्विट करुन म्हणाले की, घोटाळ्याचा तपास करणार्या ईडीने आतापर्यंत नील सोमय्या आणि मेधा सोमय्या यांना अद्याप अटक का केली नाही?.
राऊत पुढे म्हणाले की, राकेश वाधवान हा पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाइंड आहे. वर्ष 2015-16 मध्ये देवेंद्र लधानी यांच्या बँक खात्यात वाधवान यांनी 4.15 कोटी रुपये जमा केले. लधानी हे किरीट सोमय्या यांचे भागिदार आहेत. किरीट सोमय्या यांना या बँक घोटाळ्याचा फायदा झाला असल्याचे राऊत यांनी म्हटले. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत नील आणि मेधा सोमय्या यांना अद्याप अटक का केली नाही?, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.