मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदार आहेत. या प्रकल्पासाठी सोमय्यांनी 400 कोटींची जमीन साडेचार कोटींमध्ये विकत घेतल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता.
तसेच या प्रकरणी बाप-बेटा तुरुंगात जातील असेही राऊत म्हणाले होते. मात्र संजय राऊत यांच्या आरोपांत तथ्य नसल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर दुसरीकडे नील सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार होती. मात्र ती सुनावणी होऊ शकली नाही. आता सोमवार 28 फेब्रुवारी रोजी यावर सुनावणी होणार आहे.