संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

नुसत्या विकासकामांतून मते मिळत नाहीत; मुश्रीफांचे धक्कादायक विधान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदनगर – पंतप्रधान मोदींपासून नगरसेवकांपर्यंत सर्वच राजकीय नेते विकासकामांवर निवडणुकांना सामोरे जात असतात आणि केलेल्या कामांचा लोकांसमोर आढावा घेऊन मते मागत असतात. पण राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विकासकामांवर मते मिळत नाहीत, त्यापेक्षा लोकांची वैयक्तिक कामे करा असे सांगितले.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी भवनात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या योजना लोकांपर्यंत पोचवल्या जात नाहीत. केवळ विकासकामे करून मते मिळत नसतात हा आपला अनुभव आहे. एखाद्या गावासाठी रस्ता तयार केल्यास त्या गावाची सोय होते. पण त्या गावातील गोरगरीब जनतेची वैयक्तिक कामे मात्र होत नाहीत. आणि ती कामे लोकप्रतिनिधींनी करायला हवीत. अशा प्रकारची कामे केल्यास जनसंपर्क वाढतो. एखाद्याला ठेच लागली तरी ती कळली पाहिजे. एवढा आपला संपर्क असायला हवा, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी ओबोसी आरक्षणाची अडचण आहे. ही अडचण पुढील काही दिवसांत दूर होऊन येत्या जून महिन्यात नगर पालिकांच्या निवडणुका होतील. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आमदार आशुतोष कालेजीळ, परिषदेच्या अध्यक्ष राजेश्री घुले आदी अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकारी हजर होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami