मुंबई : भाजपच्या निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुपूर शर्मा यांना २५ जून रोजी जबाब नोंदविण्यासाठी समन्स बजावले आहे.
दरम्यान, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नूपूर शर्मा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. शर्मा यांच्यावर पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात २५ जून रोजी त्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, एका वृत्त वाहिनीवरील चर्चे दरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या नूपूर शर्मा यांच्या विरोधात मुस्लीम संघटनांनी पोलिसांत धाव घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी नूपूर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. शर्मा यांच्या वक्त्यव्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. मुस्लीम संघटनांकडून देशभरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. देशाबाहेरही याचे पडसाद उमटल्यानंतर भाजपने नूपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. शर्मा यांच्या विरोधातील आंदोलन, पक्षाने केलेली कारवाई यानंतर आता पोलिसांकडून देखील कारवाई सुरू केली आहे. पायधुनी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये मुंबई पोलिसांनी नूपूर शर्मा यांना समन्स बजावले आहे. या गुन्ह्यात आपला जबाब नोंदविण्यासाठी २५ जून रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे, असे या समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या या समन्सनंतर नूपूर शर्मा चौकशीला उपस्थित राहणार की, अन्य प्रकारे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.