संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

नॅशनल लोकदलाचा महामोर्चा! पवार, नितीश सहभागी होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंडीगढ:- देशातील वेगवेगळ्या विरोधी पक्षांचे नेते एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. 25 सप्टेंबर म्हणजेच येत्या रविवारी इंडियन नॅशनल लोक दलाच्या नेतृत्वाखाली हरियाणातील चौधरी देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त फतेहाबादमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आला आहे. आयएनएलडीच्या मेळाव्यात विरोधी पक्षाचे नेते शरद पवार, नितीश कुमार, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे, कनिमोळी सहभागी होणार असून, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल यांनीही हरियाणातील आयएनएलडीच्या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. जनता दल युनायटेडचे नेते के.सी. त्यागी यांनी याबाबत माहिती दिली आहे. हरियाणात विरोधक जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

या मेळाव्यात लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या कार्यक्रमाचे आमंत्रण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव, शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल यांच्यासह विरोधी पक्षाच्या इतरही नेत्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण धाडण्यात आले आहे. मात्र त्यांच्या सहभागाबाबत अद्याप ठोस माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami