कर्जत – मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ स्थानकाजवळ रुळाचे काम हाती घेतले जाणार असल्याने आज ७ ऑक्टोंबरपासून पुढील ६ दिवस नेरळ पाडा रेल्वे फाटक वाहनचालक आणि नागरिकांसाठी पूर्णवेळ बंद राहणार आहे.तरी या काळात पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
नेरळ रेल्वे फाटक ७ ऑक्टोंबर ते १२ ऑक्टोंबर दरम्यान रुळाच्या कामासाठी बंद राहणार आहे. नेरळ रेल्वे स्थानकाजवळ चालणाऱ्या कामाला अडथळा येऊ नये म्हणून ही नागरिकांची आणि वाहनांची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.नेरळ शहराला पूर्वेकडील अनेक गावे जोडली गेली आहेत.याचा मार्गावरून या गावांकडे जावे लागते.मात्र आता पुढील सहा दिवस वाहनचालकांची मोठी गैरसोय होणार आहे.ही परिस्थिती लक्षात घेता पर्यायी मार्ग म्हणून साई मंदिर पेशवाई मार्गाने दापत येथील रस्त्याचा वापर करावा.याचा मार्गावरून जिते येथून आंबिवली गेट मधून कर्जत दिशेला जाता येईल.तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांनी नेरळ रेल्वे स्थानकातील पुलाचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.