नवी दिल्ली – फ्रान्सचे जगविख्यात ज्योतिषी माइकल दि नॉस्ट्रॅडॅमस यांनी कित्येक वर्षांपूर्वी आजच्या रशिया-युक्रेन युद्धाची भविष्यवाणी केली होती. त्यांनी आतापर्यंत वर्तवलेल्या सर्वच भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे नॉस्ट्रॅडॅमसच्या या भविष्यवाणींवर जगाचा विश्वास आहे. कारण आजवर त्यांनी जी भाकिते वर्तविली होती, ती प्रत्यक्षातही घडली आहेत. आजही रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. नॉस्ट्रॅडॅमसने सोने, चांदी आणि अणुबॉम्ब हल्ल्यावरही मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे २०२२ मध्ये यापुढेही काय काय घडणार आहे ते नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीतुन स्पष्ट झाले आहे.
नॉस्ट्रॅडॅमसने २०२२ साठी ज्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्या जगासाठी चिंतेचा विषय आहे. या भविष्यवेत्त्याने युरोप युद्धात लोटला जाणार असल्याचे भाकित केले होते. अनेक देश या युद्धामध्ये उतरणार आहेत. २०१७ ते २०१८ रशिया संकटातून बाहेर पडण्यास आणि जागतिक प्रभावाच्या दिशेने पहिली पावले उचलण्यास सक्षम असेल तर २०२३ मध्ये रशियापुढे नवीन क्षितिज उघडतील, अशी देखील भविष्यवाणी केली आहे.
अणुयुद्धाची भविष्यवाणी नॉस्ट्रॅडॅमसने केली आहे. परंतू याच अण्वस्त्रांमुळे पृथ्वीवरील वातावरणात मोठे बदल होतील. तसेच पृथ्वीच्या स्थितीतही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविली आहे. घनघोर युद्धात तीन दिवस जग अंधारात असेल आणि त्यानंतर आधुनिक जीवन संपेल. २०२२ मध्ये विनाशानंतर शांतता नांदेल, असे नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीत म्हटले आहे. २०२२ च्या सुरुवातीलाच युरोपवर युद्धाचे मोठे संकट कोसळेल. यामुळे मोठमोठी वादळे निर्माण होतील. जगातील अनेक भागात भीषण आग, दुष्काळ आणि पूर अशी परिस्थिती निर्माण होईल. मोठ्या प्रमाणावर भूकबळीची समस्या जाणवेल, अशी या भविष्यवाणी या भविष्यवेत्त्याने केली होती. नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हटले आहे की, २०२२ मध्ये महागाईवर कोणाचाच लगाम नसेल. वेगाने अमेरिकी डॉलर कोसळणार आहे. २०२२ मध्ये लोक सोने, चांदी आणि बिटक़ॉईनलाच संपत्ती समजू लागणार आहेत. यामध्ये लोक जास्त पैसा गुंतवू लागतील आणि हेच कारण पृथ्वीला उद्ध्वस्त करणार आहे.