संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

नोएडामध्ये भिंत कोसळून चौघांचा मृत्यू! ९जण जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नोएडा : चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता नोएडामध्येही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील सेक्टर-२१ येथील पॉश भागातील जलवायू बिहार अपार्टमेंटची भिंत कोसळली. या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे नऊ जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. भिंतीखाली दबलेल्या सुमारे ९ जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर ३ जेसीबीच्या साहाय्याने भिंतीचा ढिगारा हटवून इतर लोकांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर-२१ मधील पॉश एरिया असलेल्या जलवायू ​​बिहार अपार्टमेंटमध्ये हा अपघात झाला. येथे नाल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. नाल्यातील विटा काढत असताना सुमारे १०० मीटरची ही भिंत कोसळली. दुरुस्तीच्या कामात गुंतलेले मजूर जागीच ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेनंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.माहिती मिळताच स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. गौतम बुद्ध नगर जिल्हा दंडाधिकारी सुहास एलवाय यांनी सांगितले की, सेक्टर-२१ च्या जलवायू बिहार अपार्टमेंटमध्ये प्राधिकरणाकडून कंत्राटावर नाल्याच्या दुरुस्तीचे काम केले जात होते. तेव्हा हा अपघात झाला. ही दुर्घटना घडली तेव्हा मजूर विटा काढत असल्याचे कळले आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. नोएडा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी घटनास्थळी १३ मजूर काम करत होते. यातील ९ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे.अपघातात बळी पडलेल्या दोघांचा जिल्हा रुग्णालयात तर दोघांचा कैलास रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींबाबत अधिक माहिती घेतली जात असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भिंत कोसळल्याने अनेक लोक अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. ढिगारा हटवण्याबरोबरच इतर मजुरांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येथे काम करणारे सर्व मजूर बदाऊन येथील रहिवासी आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर सरकारच्या वतीनेही शोक व्यक्त करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून युद्धपातळीवर मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांच्या उपचारासाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami