काबूल- अफगाण महिला हक्क कार्यकर्त्या महबूबा सेराज यांच्या नावाचा २०२३ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठीच्या अंतिम निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. सेराज या एक निर्भय मानवाधिकार प्रचारक आहेत.ऑगस्ट २००१ मध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर युद्धग्रस्त देश सोडण्याची संधी मिळूनही त्या त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्या होत्या.या पुरस्कारासाठी अंतिम विजेत्याच्या नावाची घोषणा ऑक्टोबर महिन्यात केली जाण्याची शक्यता आहे.
तालिबानकडून धमक्या आल्यानंतरही ७५ वर्षीय वृद्ध महिला सेराज यांनी महिला आणि मुलींच्या हक्कांसाठी लढणे आणि घरगुती अत्याचाराला कंटाळून घरातून पळालेल्या महिलांना आश्रयस्थान देण्याची मोहीम राबविणे त्यांनी सुरूच ठेवले आहे. तसा अहवाल रेडिओ फ्री युरोप रेडिओ लिबर्टीने अहवाल दिला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा त्यांचे नाव नोबेल शांती पुरस्कार पुरस्कारासाठी अंतिम निवड नामांकन यादीमध्ये समाविष्ट केले.त्यावेळी त्यांचे कार्य आणि धैर्य ओळखले गेले. सध्या तुरुंगात असलेल्या इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आणि वकील नर्गेस मोहम्मदी यांच्यासोबत महबूबा सेराज यांना संयुक्तपणे नामांकन करण्यात आले.येत्या ऑक्टोबर महिन्यात या पुरस्कारासाठी विजेत्याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.दरम्यान,सेराज यांनी हा पुरस्कार जिंकणे हा माझ्यासाठी आणि अफगाणिस्तानसाठी एक मोठा सन्मान असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.