संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

नोबेल पुरस्कार विजेत्याला
१० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मिंस्क – नोबेल पुरस्कार विजेते,मानवाधिकार कार्यकर्ते एलेस बालियात्स्की यांना न्यायालयाने १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.एलेस यांना गेल्यावर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. बेलारूसच्या न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला सुरू होता. यामध्ये बेलियात्स्की यांच्यासह तिघांवर सरकार विरोधी आंदोलनाला आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप होता. यात तिघेही दोषी आढळल्यानतंर न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

२०२० च्या निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतर सरकारने या चौघांना अटक केली होती.
तेव्हा सत्ताधारी राष्ट्रपती लुकाशेंको यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मदतीने त्यांच्या टीकाकारांना तुरुंगात डांबले होते.काहींना देशाबाहेरही घालवण्यात आले होते.
बेलियात्स्की,स्टेफानोविच, लॅबकोविच हे जुलै २०२१ पासून ताब्यात आहेत. सुरुवातीला त्यांच्यावर कर चोरीचा आरोप केला होता. विरोधी आंदोलनाला पैसे पुरवण्यासाठी बेलारूसमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांची तस्करी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. असे आरोप सिद्ध झाल्यास सात ते १२ वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या