संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

नो क्वेशन्स अन्सर्स; संजय राऊत भर पत्रकार परिषदेत राव यांच्या कानात कुजबुजले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई -देशात भाजपविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी देशातील इतर पक्षांनी मोट बांधायला सुरुवात केली. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रशेखर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मात्र, या पत्रकार परिषदेतील व्हिडिओ संजय राऊत यांच्या एका कुजुबजण्याच्या प्रकारामुळे प्रचंड व्हायरल झाला आहे. पत्रकार परिषदेला सुरुवात होताच संजय राऊत चंद्रशेखर राव यांच्या कानात कुजबुजले. ‘तुम्ही फक्त बोला, नो क्वेशन अन्सर्स’, असं राऊत राव यांच्या कानात कुबजुबले आणि त्यांचे हे वाक्य माईकने लागलीच पकडले. त्यामुळे राऊत नेमक्या कोणत्या प्रश्नांना घाबरत आहेत? असा सवाल विचारला जात आहे.

काही दिवसांपूर्वीही संजय राऊतांनी एक मोठी वादळी हायव्होल्टेज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊतांचा फंडा नो क्वेशन, अन्सर हाच होता. त्यामुळे राऊतांना कसल्या प्रश्नांची भिती वाटतेय? असा सवाल लोक विचारत आहेत.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संवाद साधला. ते म्हणाले की, देशातील राजकारण गढूळ बनत असल्याचं सांगत आज नवी सुरुवात आम्ही केल्याचं म्हणाले. तसंच याला आकार येण्यास काहीसा वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचा इशारा देत भाजपला थेट आव्हान दिलंय.आम्ही दोघं भाऊ लागतो, कारण आमची हजार किलोमीटरची सीमा जोडली आहे. त्यामुळे एकत्र काम करावे लागते, पुढेही एकत्र काम करू. देशाच्या राजकारणातबाबत तर चर्चा होणारच होती. आज ज्या पद्धतीने देश चालला आहे, त्यात बदल झाला पाहिजे.देशात एका मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. देशातल्या युवकांना देशातला महोल नाही खराब केला पाहिजे. अशी आमची अपेक्षा आहे. इतर पार्टीच्या लोकांशीही आम्ही एकत्र काम करण्याबाबत बोलणार आहोत. महाराष्ट्रातून निघालेला मोर्चा देशात क्रांती घडवतो. एक चांगली सुरूवात आम्ही इथून करत आहोत, असेही राव यांनी सांगितले. मात्र या भेटीनंतरही चर्चा फक्त राऊतांची आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami