संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीच्या मार्‍यासमोर दक्षिण आफ्रिकन संघ 95 धावांवर ढेर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

क्राइस्टचर्च- यजमान न्यूझीलंड आणि पाहुण्या दक्षिण आफ्रिका संंघांमध्ये आजपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीच्या कडव्या मार्‍यासमोर दक्षिण आफ्रिकन संघ अवघे 95 धावांवर ढेर झाला. त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पहिल्या दिवसाअखेर 3 बाद 116 धावा केल्या. आता न्यूझीलंड संघाकडे 21 धावांची आघाडी घेतली असून दक्षिण आफ्रिकेसाठी मॅट हेन्रीने 23 धावांत 7 विकेट्स एकट्याने घेतल्या. तसेच काईल जेमीसन, टिम साउदी आणि नील वॅगनर यांनी 1-1 विकेट घेतली.
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लाथमने नाणेफेक जिंकली आणि दक्षिण आफ्रिकन संघाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. संघाची पहिली विकेट अवघ्या 1 धावेवर पडली. 40 धावांच्या आत संघाने 4 आघाडीचे फलंदाज गमावले, त्यापैकी मॅट हेन्रीने 2 बळी पडले. दक्षिण आफ्रिकेच्या 7 फलंदाजांना दुहेरी आकडा गाठणेही कठीण झाले. यापैकी 2 फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी त्याचे फक्त 4 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले, ज्यात सारेल एरवी, एडन मार्करम, झुबेर हमझा आणि यष्टिरक्षक फलंदाज काइल वेरेन यांचा समावेश आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडच्या संघाचीही खराव सुरुवात झाली. 16 धावांवर संघाचा पहिला बळी सलामीवीर फलंदाज विल यंगच्या रुपात गेला. त्याने 8 धावा केल्या.
न्यूझीलंडचा संघ 36 धावांवर असताना सलामीवीर फलंदाज टॉम लॅथम बाद झाला. तो 15 धावा करुन आपल्या तंबूत परतला. तर डेव्हॉन कॉनवे आणि हेन्री निकोल्स (नाबाद 37 धावा ) यांनी न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र डेव्हॉन 36 धावांवर बाद झाला. त्यानंतर पहिल्या दिवसाअखेर निकोल्स आणि नील वॅगनर (नाबाद 2 ) नाबाद परतले आणि न्यूझीलंडचा संघ 3 बाद 116 धावा केल्या. यापूर्वी दक्षिण आफ्रिकन संघाने मायदेशात पहिली कसोटी गमावल्यावर दमदार पुनरागमन करून भारताविरुद्ध जबरदस्त विजय मिळवला होता. अशा परिस्थितीत आता न्यूझीलंड दौर्यावर देखील दक्षिण आफ्रिका संघ मागे पडल्यावर अशीच कमाल करू शकतो की नाही हे पाहावे लागेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami