संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

न्यूझीलंडमध्ये मुसळधार कहर! ऑकलंड शहरात तिघांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वेलिंग्टन- न्यूझीलंडमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः कहर माजवला आहे.सर्वात मोठे शहर ऑकलंडमध्ये निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे तीन जण ठार झाले तर एक जण बेपत्ता आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी ऑकलंडमध्ये आणीबाणी जाहीर केली. शुक्रवारी रात्री काही ठिकाणी अवघ्या तीन तासांत १५ सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला.

न्यूझीलंडचे नवे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी लष्करी विमानातून शहराची पाहणी केली. जेसिंडा आर्डर्न यांच्या राजीनाम्यानंतर हिपकिन्स यांनी बुधवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.पावसाचा ऑकलंडला चांगलाच फटका बसला आहे, असे हिपकिन्स म्हणाले. आणखी पाऊस पडू शकतो, यासाठी शहरातील नागरिकांनी सज्ज राहण्याची गरज आहे. यापूर्वी, ऑकलंड विमानतळ टर्मिनलच्या काही भागात पूर आल्याने आणि सर्व उड्डाणे रद्द केल्याने शेकडो प्रवासी रात्रभर विमानतळावर अडकून पडले होते. दरम्यान, रेमुएरा उपनगरात भूस्खलनात घर कोसळल्याने एकाचा पत्ता लागलेला नाही. जिल्हा व्यवस्थापक ब्रॅड मॉस्बी यांनी सांगितले की, परिसरातील आपत्ती निवारण संस्थेने घरांमध्ये किंवा कारमध्ये अडकलेल्या १२६ लोकांना वाचवले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या