संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

न्यूझीलंड भूकंपाने हादरले
त्सुनामीचा अलर्ट जारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वेलिंग्टन- न्यूझीलंडमध्ये आज गुरुवारी भुकंपाचे धक्के जाणावले आहे. या भूकंपाची तीव्रता ७.० रिश्टर स्केल इतकी होती.युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे या जगातील भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेच्या मते, न्यूझीलंडच्या केर्मडेक बेटांमध्ये ७.०रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.या भूकंपाचा केंद्र जमिनीपासून १० किलोमीटर आत असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर त्याठिकाणी त्सुनामीचा अलर्टही जारी करण्यात आला आहे.

या भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटर पर्यंतच्या अंतरात त्सुनामी येऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याआधी ६ फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मोठे नकसान झाले आहे.रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.८ इतकी होती.या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कीच्या दक्षिणेकडील गाझियानटेप होता. हा भाग सीरिया आणि तुर्कस्थानच्या सीमेवर आहे. अशा स्थितीत या भूकंपामुळे दोन्ही देशांत प्रचंड नुकसान झाले. यामध्ये ४४ हजार लोकांचा मृत्यू झाला. लाखो लोकांची घरेही उद्ध्वस्थ झाली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या