न्यूयॉर्क – पगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी द न्यूयॉर्क टाइम्समधील एक हजार पेक्षा अधिक कर्मचारी मध्यरात्री 24 तासांच्या संपावर गेले आहेत.1970 नंतर पहिल्यादाच न्यूयॉर्क टाइम्समध्ये कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
कर्मचाऱ्यांचा वेतन करार 2021 मध्ये संपला होता. त्यानंतर नवीन करार करुन पगारवाढ करण्याची मागणी कर्मचारी युनियनने मागणी केली. याबाबत दीड वर्षांपासून व्यवस्थापनासोबत युनियनने बैठका घेतल्या होत्या. मात्र त्यातून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे कर्मचारी युनियनने द न्यूयॉर्क टाइम्समधील एक हजार पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना 24 तासांच्या संपाची हाक दिली. आता कर्मचारी मध्यरात्री 24 तासांच्या संपावर गेले आहेत. द न्यूयॉर्क टाइम्स कार्यालयातील कर्मचारी 1970 नंतर पहिल्या संपावर गेले असल्याने संपूर्ण अमेरिकेत आर्श्चय व्यक्त होत आहे. असे असले तरी द न्यूयॉर्क टाइम्सचा अंकावर कोणताही परिणाम होणार असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.