संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

पंकजाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा गोंधळ! धक्काबुकी करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड – सावरगावच्या भगवान गडावर आज पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. मात्र मेळाव्यानंतर काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि पोलिसांना धक्काबुकी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनेमुळे मेळाव्याला गालबोट लागले. दरम्यान या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले कि, २०१९ च्या पराभवानंतर, मला काही मिळाले नाही म्हणून मी नाराज आहे असे सांगितले जात आहे. पण ते साफ खोटे आहे . मी कुणावरही नाराज नाही. त्यामुळे नाराजीच्या चर्चाना पूर्णविराम द्या! असे त्यांनी मीडिया आणि आपल्या कार्यकर्त्यांनाही आवाहन केले आहे.

आज भगवान भक्ती गडावर झालेल्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. मात्र पंकजाचे भाषण सुरु असताना गर्दीतील काही लोक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते . त्यांना भाषणादरम्यान पंकजाने शांत राहण्याचे वारंवार आवाहन केले . मात्र त्यांचे भाषण संपल्यानंतर गोंधळ वाढला . काही कार्यकर्ते पंकजाला भेटण्यासाठी व्यासपीठाजवळ आले . त्यांनी पंकजाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना अडवले. त्यामुळे पोलिसांशी त्यांची बाचाबाची सुरु झाली. त्यातील काहींनी पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की सुरु करताच, पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.या घटनेमुळे मेळाव्याला काहीसे गालबोट लागले. . मात्र पोलिसांनी नंतर परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वातावरण शांत केले. दरम्यान पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भाषणात मोदी आणि अमित शहा यांची तारीफ केली . तसेच माझ्यासमोर केवळ माझ्या वडिलांचाच आदर्श नाही तर दीनदयाळ उपाध्याय अटलबिहारी वाजपेयी ,नरेंद्र मोदी आणि अमितशहा यांचाही आदर्श आहे. २०१९ मध्ये माझा पराभव झाल्यांनतर मला काही मिळाले नाही त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. पण मी मात्र कुणावर नाराज नाही.त्यामुळे माझ्या नाराजीच्या चर्चाना आता पुनविराम द्या . असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच आता आपण २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागणार आहोत. पक्षाने तिकीट दिले तर परळीतून निवडणूक लढवीन . भगवान बाबांची सात्विकता आणि मुंडेंचा आदर्श हीच माझी ओळख आहे. मी स्वाभिमानाने जागें आणि स्वाभिमानानेच मरेन असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले या मेळाव्याला भाजप खासदार सुजय विखे यांच्यासह भाजपचे ४ आमदार तसेच रासपचे महादेव जानकर आदी नेते हजर होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami