संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

पंचगंगा नदीत गणपती विसर्जनासाठी गेलेला १ जण बेपत्ता, एकजण वाचला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात गणपती विर्सजन हे नदीतच होणार अशी आडमुठी भूमिका घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. दरम्यान गणपती विसर्जन हे खणीत किंवा कुंडामध्ये करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.तरीही पाच दिवसांच्या गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाला न जुमानता पंचगंगा नदीत काल गेले होते. यावेळी दोन युवक वाहून गेले. यातील एकाला वाचवण्यात यश आले तर दुसरा अद्याप बेपत्ता आहे. यामुळे नदीत गणपती विसर्जन करणारचं या लोकप्रतीनिधींच्या युवकांच्या भूमिकेवर नागरिकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. घरगुती गणपतीचे विसर्जन करत असताना कबनूर येथिल दत्तनगरात गल्ली नंबर ८ येथे राहणारा स्वप्नील मारुती पाटील (२२ ) हा रुई येथील युवक पंचगंगा नदीत वाहून गेला. तर नागरिकांनी विशाल पाटील या युवकाला वाचविण्यात यश आले. काल सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे स्वप्नीलला पोहायला येत होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. सोमवारी घरगुती गणपतीचे विसर्जन असल्याने हातकणंगले तालुक्यातील रुई येथे पंचगंगा नदीवर मोठी गर्दी होती.इंगळी गावाकडील बाजूस स्वप्नील गणपती विसर्जन करीत होता.पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami