चंदिगढ – आज पंजाब आणि युपीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. पंजाबमध्ये ११७ जागांसाठी ६४.२४ टक्के तर युपीमध्ये तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीत ५९. १८ टक्के इतके मतदान झाले. आजच्या मतदानानंतर पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीत चणी यांच्यासह १३०४ उमेदवाराचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. तर युपी मध्ये ६२७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.
१० मार्च रोजी निकाल आहे. पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडले दुपारी १ वाजेपर्यंत ३८ .१७ टक्के इतके मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला आणि सायंकाळी ६ वाजेपर्यंत पंजाब मध्ये ६४.२४ टक्के मतदान झाले . पंजाब मध्ये सत्ताधारी कॉंग्रेसह आप ,भाजपा आणि शेतकऱ्यांचा संयुक्त समाज मोर्चा यांच्यात लढत आहे. आजच्या मतदानानंतर मुख्यमंत्री चणी,कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सिद्धू,माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग ,प्रकाशसिंग बदल,राजिंदर कौर भट्टल ,भाजपा प्रदेशाध्यक्ष अश्विनी कुमार यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे .तर दुसरीकडे युपी मध्ये तिसर्या टप्प्यातील निवडणुकीत हाथरस, फिरोजाबाद,इटा,हमिद्पूर, ललितपुर, कानपूर शहर आणि ग्रामीण,झाशी ,जलौन मैनपुरी कनौज ,महोबा ,कास्गांज इटावा आदी १६ जिल्ह्यांमधील ५९ जागांसाठी मतदान झाले. सकाळी ८ वाजल्यापासून शांततेत मतदानाल सुरुवात झाली आणि सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५९.१८ टक्के इतके मतदान झाले. आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह ६२७ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. युपी मध्ये सत्ताधारी भाजपसह कॉंग्रेस, सपा , बसपा अशी चौरंगी लढत आहे . युपी मध्ये सात टप्प्यात मतदान होणार असून अजून चार टप्प्यांचे मतदान बाकी आहे.