पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वादावर आज राहुल गांधींची आमदारांशी चर्चा

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

नवी दिल्ली – पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकांसाठी या मुद्द्यावर लवकरच तोडगा काढणे अनिवार्य आहे. त्यामुळेच काँग्रेस हायकांडकडून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज दिल्लीत पंजाबमधील आमदारांशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांत पंजाब काँग्रेसमधील असंतोषाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, त्यांचे स्पर्धक नवज्योतसिंग सिद्धू आणि इतर नेते, आमदारांनी दिल्लीत हजेरी लावली आणि आपापले म्हणणे श्रेष्ठींनी नेमलेल्या समितीपुढे मांडले. पंजाब प्रदेश काँग्रेसमधील गटबाजी संपवण्याच्या उद्देशाने अ.भा. काँग्रेस समितीतर्फे स्थापन करण्यात आलेल्या या तीन सदस्यांच्या समितीने याबाबतचा अहवाल गुरुवारी पक्षप्रमुख सोनिया गांधी यांना सादर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज राहुल गांधींच्या निवासस्थानी होणाऱ्या आमदारांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami