संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 04 July 2022

पंजाब निवडणुकीत एकच शरीर असलेल्या जुळ्या भावांचे पहिले मतदान ठरले ऐतिहासिक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमृतसर – पंजाबमधील ११७ विधानसभा जागांवर एकूण १३०४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या काळात मतदारांचा उत्साहही उंचावला असून, या मतदानादरम्यान मतदारांना प्रेरित करणारे चित्र समोर आले आहे. दो जिस्म एक जान या चित्रपटाद्वारे संपूर्ण देशात आपला ठसा उमटवणाऱ्या सोहना सिंग आणि मोहना सिंग या जुळ्या भावांनी एक अनोखा आदर्श ठेवत सर्वप्रथम मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. हे दोघे भाऊ एकाच शरीराशी संबंधित असले तरी निवडणुकीतील मतांसाठी त्यांनी आपली असहायता आड येऊ न देता त्यानुसार दोघांनीही आपला मतदानाचा हक्क बजावत इतिहास घडवला आहे.

कंबरेखाली एकच शरीर पण हृदय, डोके, हात वेगळे असलेल्या पंजाबमधील प्रसिद्ध सोहना-मोहना या जुळ्या भावंडांना रविवारी पहिल्यांदाच मतदान केले. . निवडणुकीच्या इतिहासातील ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. कारण शरीर एकच असले तरी दोघांच्या मतदानाची गोपनीयता राखण्यासाठी निवडणूक आयोगाला वेगळी व्यवस्था करावी लागली. त्यानुसार दोघांनीही आपला मतदानाचा हक्क बजावत इतिहास घडवला. पंजाबमधील विधानसभेच्या ११७ जागांसाठी रविवारी मतदान झाले. १० मार्चला मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी सोहना आणि मोहना यांना दोन स्वतंत्र मतदार ओळखपत्रे देण्यात आली आहेत. मागील वर्षी ते १८ वर्षांचे झाले होते. मतदानावेळी त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दोघांनाही स्वतंत्रपणे मतदान करता येईल आणि त्यांची गोपनीयता राखली जाईल, याची दक्षता आयोगानं घेतली. निवडणूक आयोगाने सोहना आणि मोहना यांना स्वतंत्र मतदार मानले होते आणि दोघांना वैयक्तिक मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दोघांनी अमृतसरमधील बूथ क्रमांक १०१ वर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. दोघांनी आपल्या मर्जीने मतदान केलं.

सोहन सिंह व मोहन सिंग या दोघांचा जन्म दिल्लीत २००३ मध्ये झाला. पण त्यांच्या शारीरिक स्थितीमुळे आई-वडिलांनी त्यांना सोडून दिलं.अमृतसरमधील एका स्वयंसेवी संस्थेने त्यांचा सांभाळ केला. दोघांनी आयटीआयचे शिक्षण घेतल्यानंतर इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदविका प्राप्त केली आहे. आता ते एका सरकारी कार्यालयात नोकरी करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami