संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

पंढरीत विठुरायाचा विवाह सोहळा; ३६ प्रकारच्या ७ टन फुलांची सजावट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पंढरपूर – वसंत पंचमी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा विशेष दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे. या दिवशी, भक्त विशेषतः विद्या आणि बुद्धीची देवी सरस्वतीची पूजा करतात आणि प्रार्थना करतात. या दिवसाला पंढरपूरात ही विषेश महत्त्व आहे.आज पंचमीच्या मुहूर्तावर लाखो भाविकांचे आराध्यदैवत असणारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न झाला.

देवाच्या या विवाह सोहळ्यासाठी रुक्मिणीमातेस खास रेशमी साडी तर विठ्ठलास रेशमी पोशाख तयार करण्यात आला आहे.मात्र कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर हा विवाह सोहळा अगदी मर्यादीत भक्तामध्येच पार पडला. विवाह सोहळ्यासाठी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्तीना दागदगिने आणि भरजरी पोषाखात नटवले होते.श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्तीना पाहून मंडपातील सर्वच भाविक भारावून गेले होते. दागदगिन्यांमध्ये देवाचे रुप अधिकच खुलुन दिसत होते. या सोहळ्यासाठी ३६ प्रकारच्या सात टन फुलांची आकर्षक अशी सजावट आज मंदिरात करण्यात आली होती.ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami