संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पंतप्रधानांचा पारंपरिक हिमाचली टोपी, चोला-डोरा पोशाख

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

देहरादून:- पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून केदारनाथ आणि बद्रीनाथच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील विकासकामांची पाहणी करण्यासोबतच काही नवीन प्रकल्पांचे भूमिपूजनही करणार आहेत. दौऱ्याला सुरुवात करण्याआधी मोदींनी केदारनाथ मंदिरात जाऊन पूजा केली.यावेळी पंतप्रधानांनी ‘चोला डोरा’ नावाचा पारंपारिक पहाडी पोशाख परिधान केला होता. या पोशाखाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरली आहे.त्यांच्या या पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

हिमाचल प्रदेशातील चंबा येथील महिलांनी हा खास पोशाख पंतप्रधानांसाठी बनवला असून नुकत्याच झालेल्या राज्य दौऱ्यात त्यांना हा पोशाख त्यांना भेट देण्यात आला होता.पंतप्रधान मोदी यांनी नुकताच हिमाचल प्रदेशचा दौरा केला होता. यादरम्यान एका महिलेने त्यांना खास चोला डोरा पोशाख भेट दिला होता. चंबा येथे राहणाऱ्या एका महिलेने स्वत:च्या हाताने तो बनवला आहे. त्यावर उत्कृष्ट अशी हस्तकलाही करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी या महिलेला वचन दिले होते की मी जेव्हाही थंड ठिकाणी जाईल तेव्हा हे नक्कीच परिधान करणे अखेर मोदींनी हे वचन पूर्ण केले.दरम्यान मोदींचा उत्तराखंड दौरा अतिशय खास मानला जात आहे. पंतप्रधान मोदी येथे 3400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी किंवा उद्घाटन करणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami