नवी दिल्ली- गुजरातमधील बनासकांठा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत मोठा कट रचण्याचा आला. याबाबत एक व्हिडिओ समोर आला असून ज्यामध्ये एक व्यक्ती मोदींच्या रॅलीत उभारण्यात आलेल्या मंडपाचे स्कू्र उघडताना दिसत आहे. त्याला कोणी पाडू नये, अशा पद्धतीने तो आपले काम करत असल्याचे दिसते. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला.
आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोदी हे विविध योजनांचे उद्घाटनासाठी गुजराज दौऱ्यावर येत आहेत. मोदींनी बनासरकांठाच्या थरडमध्ये 8 हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायभरणींही केली. या रॅलीत अपघात घडवण्याचा कट असल्याचा संशयीत व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती मंडपांमध्ये लावलेल्या लोखंडी बॅटचे नट बोल्ट कसे उघडत दिसत आहे. यामध्ये तो उभा राहून गुपचूप आपले काम करत आहे.मग थोड्या वेळाने तो नट-बोल्ट घेऊन खुर्चीवर बसतो. नोव्हेंबर 2013 मोदींच्या पाटणा रॅलीत सिरियल बॉम्बस्फोट झाले होते. अशा परिस्थितीत मोदींना सुरक्षेतील त्रुटी हा तपासाचा विषय ठरू शकतो.