संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

पक्षातील लोकांनीच कट करून
मला मुख्यमंत्रिपदावरून हटवले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते. हे एक चांगले काम मी केले. त्यामुळेच मी पुन्हा निवडून येऊ शकलो, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. सोलापुरातील महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे भारत गौरव पुरस्कार शिंदेंना देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्वपक्षावर गंभीर आरोप केलेत. काँग्रेसमधील कटकारस्थानांचा पाढाच त्यांनी यावेळी वाचला. पक्षातील लोकांनी कारस्थान करून मला मुख्यमंत्री पदावरून हटवले. मात्र तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, असा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी करत काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. ते पुढे म्हणाले, मला मुख्यमंत्रिपदावरून हटवलं आणि राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशला पाठवले. मला कसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवलं, काय कारस्थान झाले हे मी विसरू शकत नाही, असेही ते
यावेळी म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami