संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

पटसंख्येमुळे बंद होणाऱ्या शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड : राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर, मी सुद्धा मोठा ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जाईन. म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की माझी शाळा बंद करु नका,अशा आशयाचे भावनिक पत्र बीडच्या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे.

एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, असा आग्रह धरला जातो. मात्र, दुसरीकडे मराठी शाळांना टिकवण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे इतर ठिकाणी समायोजन करून त्या बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अबाळ होणार आहे. कारण अनेक गावात गावापासून लांब कोसोदूर शाळा असल्याने प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शाळेत जाऊ शकणार नाहीत. राज्यातील विविध जिल्ह्यात हिच स्थिती आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती लक्षात घेत चौथीत शिकणाऱ्या समाधान बाबासाहेब जायभाये या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित शाळा बंद न करण्याची विनंती केली आहे. बीडमधील जायभायवाडी या डोंगरगावात समाधान राहतो. तिथे इयत्ता चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. मात्र, ही शाळा बंद झाल्यास पाच ते सात किमी लांब असलेल्या शाळेत पायपीट करून जावी लागणार आहे. ही पायपीट सहन न झाल्यास शाळा सोडावी लागेल आणि आमच्या आई-वडिलांप्रमाणेच आम्हालाही ऊसतोड कामगार व्हावे लागेल, अशी भिती या विद्यार्थ्याने पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami