मुंबई – पत्नी यास्मिनला कारने धडक देऊन तिला चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीने नोंदवलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मिश्राला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. त्यानंतर त्यांनी त्याला अटक केली.
अंधेरी पश्चिम येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये कमल मिश्राला एका मॉडेलसोबत कारमध्ये त्याच्या पत्नीने पाहिले होते. त्यानंतर मिश्राने पत्नीला कारने ठोकर मारली. नंतर तिला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यात ती जखमी झाली. ही घटना १९ ऑक्टोबरला घडली होती. या प्रकरणी त्याच्या पत्नीने अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी मिश्राला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. चौकशीनंतर रात्री त्याला अटक केली.