संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

पत्नीस नोकरी करण्यास सांगणे हिंसाचार नाही, तो तिच्या विकासाचा भाग; कोर्टाचा निकाल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – लग्न झाल्यानंतर पती पत्नीमध्ये किरकोळ वाद होणं सामान्य बाब मानली जाते. देशभरात कौटुंबिक हिंसाचाराची असंख्य प्रकरणं दररोज समोर येत असतात. पण पत्नीला नोकरी करण्यास सांगणं हा कौटुंबीक हिंसाचाराचा प्रकार असू शकतो का? याबाबत कौटुंबीक न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हा निकाल नागपुरातील कुटुंब न्यायालयाने दिला आहे.

पतीने पत्नीला नोकरी करण्यास सागणं हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही. या कृतीतून पतीला पत्नीचं सशक्तीकरण आणि विकास करायचा असल्याचं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं आहे. पत्नीला तिच्या पायावर उभं होण्यास प्रेरित करणं ही चांगली बाब असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने फिर्यादी महिलेकडून पोटगीची केलेली मागणी देखील नाकारली आहे.

नागपुरातील एका दाम्पत्याचे २०१५ साली लग्न झाले होते. लग्नानंतर काही वर्षे सुखाने संसार केल्यानंतर संबंधित पती पत्नीत वाद झाला होता. या वादानंतर दोघंही एकमेकांपासून विभक्त झाले. विभक्त झाल्यानंतर पत्नीने खावटीसाठी कोर्टात अर्ज केला. संबंधित अर्जात तिने पती नोकरी करण्यास सांगतो. सासू पहाटे उठवून घरकाम करायला लावते, असे आरोप केले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर फिर्यादीनं केलेल्या आरोपांत न्यायालयाला विशेष काही आढळून आले नाही. पत्नीला नोकरी करण्यास सागणं हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही. या कृतीतून पतीला पत्नीचं सशक्तीकरण आणि विकास करायचा असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. तसेच फिर्यादी महिला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्याने तिचे वेतनही चांगले आहे. त्यामुळे न्यायालयाने फिर्यादीस खावटी देण्यासही नकार दिला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. एड. श्याम आंभोरे यांनी पतीच्या बाजूने हा खटला लढला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami