संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

‘पत्राचाळ’ पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व खासदार शरद पवार यांच्या विशेष उपस्थितीत उद्या मंगळवार, 22 फेब्रुवारी, 2022 रोजी सायंकाळी पाच वाजता गोरेगाव पश्चिम येथील प्रबोधन क्रीडाभवन येथे आयोजित करण्यात आला आहे.

मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील म्हाडाच्या जमिनीवरील सिद्धार्थ नगर सहकारी गृहनिर्माण संस्था (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील 672 मूळ गाळेधारकांच्या प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा प्रश्न या माध्यमातून मार्गी लागणार आहे. 672 मूळ गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून 650 चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका मिळणार आहे. म्हाडा स्वतः विकासक म्हणून या संपूर्ण प्रकल्पाचे काम करीत आहे. 47 एकरवर जमिनीवर असणार्‍या पत्रा चाळीच्या पुनर्विकासासाठी पत्रा चाळीतील गाळेधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था, मे. गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व म्हाडा यांच्यात त्रिपक्षीय करारनामा झाला होता. मात्र विकासकाने पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षे रखडविला तसेच रहिवाशांना विकासकाकडून भाडे न दिल्यामुळे करारपत्रातील अटीनुसार म्हाडाने 12 जानेवारी 2018 रोजी संबंधित विकासक व संस्थेस टर्मिनेशन नोटीस जारी केली. सदर नोटीस विरुद्ध विकासकाने या प्रकल्पातील विक्री हिस्सा म्हाडाच्या परवानगीशिवाय 9 विकासकांना परस्पर विकला असल्याने सदर 9 विकासकांनी हायकोर्टात दावे दाखल केले. अशा विविध घटनांमुळे गेली अनेक वर्ष हा पुनर्विकास प्रकल्प रखडलेला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami