पनवेल- राज्यात गोवर या साथीच्या आजाराने तोंड वर काढले आहे. मुंबई, ठाणे, नाशिक तसेच अन्य शहरात गोवर आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत.मुंबईनंतर आता पनवेल महापालिका हद्दीत गोवरचा शिरकाव झाल्याचे आढळून आले आहे. बुधवारी जवळपास तीन रुग्ण तर 15 संशयित आढळून आले आहेत.पालिका हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची तपासणी केल्यानंतर या रुग्णांची माहिती मिळाली आहे. दरम्यान आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोवर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी कस्तुरबा रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली होती. पालकांनी मुलांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले होते.