संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

परबांच्या रिसॉर्टवर बुलडोझर! पर्यावरण विभागाने निविदा मागवल्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्टमधील अनियमिततेचे प्रकरण उचलून धरले होते. अखेर शिवसेना नेते अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टवर लवकरच कारवाई होणार असल्याचे समोर आले आहे. पर्यावरण विभागाकडून बांधकामातील अनियमितते प्रकरणी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या 22 सप्टेंबरपर्यंत रिसॉर्ट पाडण्यासाठी कंत्राटदारांनी अर्ज करण्याचे आवाहन या निविदेद्वारे करण्यात आले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अनिल परब यांनी 2017 मध्ये दापोली येथील जमीन विकत घेतली. मात्र त्याचे रजिस्ट्रेशन दोन वर्षांनंतर केल्याचा आरोप आहे. ही शेतजमीन असूनही सरकारी अधिकार्‍यांच्या मदतीने ती नॉन अ‍ॅग्रीकल्चर करण्यात आली. हे रिसॉर्ट बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. मुरूड ग्रामपंचायतीने ही गोष्ट मान्य केली आहे, असा दावा पर्यावरण मंत्रालयाने केला आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या रिसॉर्टवर बुलडोझर फिरणार अशीच शक्यता आता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर आता शिंदे गटाच्या मदतीने महापालिकेवर सत्ता मिळवण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. त्यामुळे अनिल परबांच्या रिसॉर्टवर कारवाई होणे, त्यांनी केलेला गैरव्यवहार उघडकीस येणे, यात भाजपाचा मोठा राजकीय फायदा असल्याचेही बोलले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami