नवी दिल्ली – राज्यात अनेक प्रकरणांत अडचणी आलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेला तपास 9 मार्चपर्यंत थांबवा, अशा आदेश सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याबाबत 9 मार्च रोजी अंतिम निर्णय घेण्यात येईल, तोपर्यंत हा तपास थांबवण्यात यावा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारने दाखल केलेले सर्व गुन्हे रद्द करावे किंवा सीबीआयकडे वर्ग करावेत, अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली. त्यांच्याविरोधातील सर्व एफआयआर सीबीआयकडे हस्तांतरित करायचे की नाही, याचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 9 मार्च रोजी होणार आहे. तोपर्यंत महाराष्ट्र सरकार यासर्व प्रकरणांची चौकशी थांबवावी, असे कोर्टाने म्हटले.