संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

परमवीर सिंगांची दोन तास चौकशी! डांगेंच्या आरोपांशी संबंध नाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी लाच मागितल्याचे आरोप केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यानंतर चौकशीसाठी त्यांनी एक दिवसआघीच म्हणजेच मंगळवारी एसीबीच्या कार्यालयात हजर लागली आणि त्यांनी दोन तासांच्या चौकशीत आपला जबाब नोंदवला. या चौकशीत एसीबी अधिकार्‍यांनी त्यांना 70 प्रश्‍न विचारले. त्यात त्यांनी डांगेच्या आरोपांशी माझ्या कोणताही संबंध नाही, माहीत नाही, अशी उत्तर दिली. चौकशी अद्याप सुरु असल्याने परमबीर सिंगांना पुन्हा चौकशीसाठी बोलवणार असल्याचे एसीबी अधिकार्‍यांनी सांगितले.

अनुप डांगे हे निलंबित होते. त्यावेळी पुन्हा सेवेत घेण्यासाठी सिंहांनी डांगेंकडे 2 कोटींची मागणी केली होती. अशी तक्रार डांगेंंनी केली होती. याप्रकरणी सिंहांना 11 जानेवारीला एसीबीने समन्स पाठवून चौकशी करता हजर राहण्यास सागितले होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाचे कारण देत त्यांनी वकिलांमार्फत एसीबीकडे पत्र व्यवहार करून दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला होता. त्यानंतर पुन्हा एसीबीने परमवीर सिंगांना चौकशीसाठी 2 फेबु्रवारी रोजी हजर राहण्यास सांगितले. मात्र सर्वोच्च न्यायालयात तारीख असल्याने ते मंगळवारी एसीबी कार्यालयात हजर झाले होते. तेथे ते दोन तासांच्या चौकशी सामोरे गेले. त्यात त्यांनी डांगेंनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami