संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

पश्चिम अफगाणिस्तानात भूकंप! घरे, इमारती कोसळल्या; २६ ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

काबूल – अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात सोमवारी दुपारी एकापाठोपाठ एक असे दोन शक्तिशाली भूकंप झाले. पश्चिम प्रांतातील बडघिस भागातील कादिस जिल्ह्यात भूकंपामुळे अनेक घरे आणि इमारती कोसळल्या. त्यात २६ जण ठार झाले असून कोसळलेल्या घरे व इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले आहेत. त्यामुळे या प्रलयकारी भूकंपातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची तीव्रता ५.६ रिश्‍टर स्केल एवढी नोंद झाली.

काही दिवसांपासून अफगाणिस्तानात भूकंपाची मालिका सुरू आहे. शुक्रवारी फैजादाबादजवळ भूकंपाचे हादरे बसले. शुक्रवारी रात्री पाकिस्तान सीमेलगत अफगाणिस्तानच्या उत्तर सीमाभागात भूकंप झाला. त्याची तीव्रता ५.६ रिश्‍टर स्केल होती. पाकिस्तान हवामान विभागाच्या माहितीनुसार, या भूकंपात कोणतीही प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाचे हादरे पेशावर, मानशेरा, बालाकोट, चारसादासह खैबर पख्तूनख्वा या शहरांच्या अनेक भागांत जाणवले. त्यानंतर सोमवारी पश्चिम अफगाणिस्तानातील बडघिस प्रांतात भूकंप झाला. या भूकंपामुळे अनेक घरे कोसळली. त्यात २६ जणांचा बळी गेला. अनेकजण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले जात आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami