संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

पश्चिम बंगालचे मंत्री साधन पांडे यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी मंत्रिमंडळातील ग्राहक आणि स्वरोजगार खात्याचे मंत्री साधन पांडे यांचे आज सकाळी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. वर्षभरापासून ते आजारी होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या ट्विटमध्ये दिली आहे.

उत्तर कोलकाताच्या बर्टोला विधानसभा मतदारसंघातून साधन पांडे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. यावेळी माणिकतळा मतदारसंघातून ते निवडून आले होते. बॅनर्जी मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला होता. वर्षभरापासून आजारी असलेल्या पांडे यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना सकाळी त्यांचे निधन झाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami