संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

पश्‍चिम बंगालमध्ये मतदानावेळी भाजपा-तृणमुलचे कार्यकर्तेे भिडले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोलकाता – पश्‍चिम बंगालमध्ये आज सकाळी कडेकोट बंदोबस्तात 108 नगरपालिकांच्या 2,171 प्रभागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली होती. या मतदानाची मतमोजणी 2 मार्चला होणार आहे. अनेक बूथबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळपासूनच लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी दाखल झाले होते. याच दरम्यान उत्तर 24 परगाना येथे मतदानावेळी तृणमुल आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली. येथील नऊ प्रभागात दोन ईव्हीएमची तोडफोडही करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत बोलताना भाजपाचे पश्‍चिम बंगालमधील उपाध्यक्ष अर्जुन सिंग यांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आज मतदानावेळी नॉर्थ 24 परगाना येथे हाणामारी झाली आहे. येथील प्रभाग नऊमध्ये दोन ईव्हीएमची तोडफोड करण्यात आली आहे. राज्यभर अशीच परिस्थिती आहे. पोलीस भाजपा कार्यकर्त्यांना अटक करत आहेत. त्यांना मतदान करू दिले जात नाही. तसेच, इथे फक्त पोलीस आणि गुंडच मतदान करत आहेत. मतदार मतदान करण्यास घाबरत आहेत, विशेषत: बंगाली लोकसंख्या, ज्यांना मतदान करू दिले जात नाही. तृणमूल काँग्रेसची कोअर व्होट बँक मुस्लिमांनाही मतदान करता येत नाही. येथील पोलीस गांधीजींच्या तीन माकडांपैकी एकाची भूमिका निभावत आहेत, असेही अर्जुन सिंग यांनी सांगितले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami