मुंबई – वैतरणा-विरारदरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज सकाळी पश्चिम रेल्वेची लोकलसेवा उशिराने धावली. त्यामुळे याचा फटका कामांवर जाणाऱ्या नोकरदारांना बसत आहे.
दोन दिवसांपूर्वी ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा वैतरणा-विरारदरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. या माहिती मिळताच काही क्षणात कर्मचारी हा बिघाड दुरुस्त केली. मात्र तोपर्यंत पश्चिम रेल्वेवर लोकलसेवेची विस्कळीत झाली. ही लोकलसेवा सकाळी 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होती.