मुंबई – सध्या महाविकास आघाडीतील पक्ष विरुद्ध भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरु आहे. शिवसेना आणि सोमय्या यांच्यात ठाकरेंच्या कोर्लायीतील १९ बंग्ल्यांवरून जो वाद पेटलाय त्यात आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उडी घेतली आहे. या प्रकरणी बोलताना नानाने सांगितले कि पहाटेचे सरकार पडल्यापासून भाजपचा थयथयाट सुरु आहे. आणि त्यांचे आरोप म्हणजे केवळ मनोरंजन यापलीकडे त्याला महत्व देण्याचे कारण नाही असे नानांनी सांगितले.
नानांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले कि उद्धव ठाकरे यांचे कार्लाईत १९ बंगले आहेत असा भाजप कडून आरोप झाला मात्र आरोप करणारा तिथे पोचला तेंव्हा बंगले गायब झाले होते. असे बिन बुडाचे आरोप करून सरकारला आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कटकारस्थान भाजपा करीत आहे. भाजपला जनतेने सत्तेमध्ये बसवले पण त्याचा भाजपकडून दुरुपयोग होत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी जे गंभीर आरोप केले आहेत त्याची चौकशी व्हायलाच हवी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नानांनी केली आहे. भाजपची सत्ता गेल्याने त्यांना नैराश्य आले आहे त्यातच पहाटेचे सरकार गेल्यापासून ते अधिकच हतबल झाले आहेत आणि त्यामुळेच त्यांचा थयथयाटसुरु आहे असेही नानांनी सांगितले.