संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

पहिल्या 10 श्रीमंत भारतीयांमध्ये
गौतम अदानींच्या भावाचेही नाव

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत अब्जादिश म्हणून गौतम अदानी यांनी 2022 आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच यांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत.त्याचप्रमाणे हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, अदानींच्या संपत्तीत वर्षभरात वाढ झाली असून, त्यांचे ज्येष्ठ बंधू विनोद शांतीलाल अदानी यांचेदेखील नाव पहिल्या 10 श्रीमंत भारतीयांच्या यादीत आहे.
आयआयएफएल वेल्थ आणि हुरुन यांनी बुधवारी जाहीर केलेल्या पहिल्या दहा श्रीमंत भारतीयांच्या यादीत गौतम अदानी यांचे ज्येष्ठ बंधू विनोद शांतीलाल अदानी यांचा समावेश आहे. विनोदभाई या नावाने ओळखले जाणारे, विनोद अदानी हे दुबईत वास्तव्यास असून ते सिंगापूर आणि जकार्ता येथे ट्रे़डिंग व्यवसाय सांभाळतात.ते 1.69 लाख कोटी रूपयांच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय ठरले आहेत. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार गेल्या एका वर्षात ते आठव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर पोहोचले आहेत.गौतम अदानी आणि कुटुंबाची संपत्ती पाच वर्षांत 15.4 पट वाढली, तर विनोद शांतीलाल अदानी आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती 9.5 पट वाढली, असे अहवालात म्हटले आहे. विनोद अदानी हे 2018 साली या यादीत 49 व्या क्रमांकावर होते. परंतु चार वर्षांमध्ये त्यांनी थेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami