कराची – पाकिस्तानमध्ये महागाईने नवा विक्रम केला असून 1975 नंतर पाकिस्तानमध्ये महागाईचा आलेख उच्चतम स्तरावर पोहोचला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 249.80 आणि डिझेलची किंमत 262.80 रुपये प्रति लिटर झाली. कांद्याचे दर 250 रुपये किलो झाल्याने नागरिक हैराण झाले आहे.
एकेकाळी पाकिस्तान इतर देशांना कांदा पाठवून कमाई करत होता. भारतात कांदा उत्पादन कमी होत होते, त्यावेळी पाकिस्तानातून कांदा आणला जात होता. मात्र आता पाकिस्तानात कांद्याचे भाव 250 रुपयांच्या वर गेल्याने जगभर आर्श्चय व्यक्त होत आहे. भारतात 5 रुपयांना मिळणारे पार्लेजी बिस्कीट पाकिस्तानात 50 रुपयांना विकले जात आहे. आपल्या देशात 40-50 रुपयांना मिळणारी ब्रेड पाकिस्तानमध्ये 150-200 रुपयांना विकली जात आहे. मूठभर पीठासाठी पाकिस्तानातील नागरिकांमध्ये आपसात लढाई सुरू आहे. शिवाय पिठाच्या गोण्यांच्या सुरक्षेसाठी एके-47 असलेले सैनिक तैनात आहेत.