संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

पाकिस्तान दौर्‍यासाठी ऑस्ट्रेलियन कसोटी संघ जाहीर! कमिन्स कर्णधार 

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सिडनी  ऑस्ट्रेलिया तब्बल 24 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौर्‍यावर जाणार आहे. त्यासाठी 18 सदसीय कसोटी संघाची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली. या संघाचे नेतृत्व पॅट कमिन्स करत आहे. तर उपकर्णधार म्हणून स्टीव्ह स्मिथची निवड करण्यात आली आहे. तसेच मुळचा पाकिस्तानी असलेल्या उस्मान ख्वाजाचीही   अ‍ॅशेस मालिकेतील दमदार कामगिरीनंतर संघात वर्णी लागली आहे. तसेच या दौर्‍यामध्ये ऑस्टे्रलियन संघाचे प्रमुख खेळाडू सहभागी होणार नाहीत, अशी जौरदार चर्चा क्रिकेट वर्तृळात सुरु होती. मात्र आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघाच्या निवडीत प्रमुख खेळाडूंना सहभागी करुन सर्व चर्चाना पुर्णविराम दिला. या संघात कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ (उपकर्णधार), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स केरी, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड, अ‍ॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा , मिचेल मार्श, मायकेल नेसर, मिचेल स्वेपसन यांना स्थान दिली आहे. ऑस्ट्रेलिया ऐतिहासिक पाकिस्तान दौर्‍यावर 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 4 मार्चला रावळपिंडी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुसरी कसोटी 12 मार्चला कराचीत तर तिसरी कसोटी 21 मार्चला लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होईल. कसोटी मालिकेनंतर दोन्ही देशात 4 वनडे सामन्यांची मालिका देखील होणार आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना 29 मार्च, दुसरा सामना 31 मार्च, तिसरा सामना 2 एप्रिल आणि चौथा सामना 5 एप्रिलला होणार आहे. वनडे मालिकेतील सर्व सामने हे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami