संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

पाच तासाच्या चौकशीनंतर नितेश राणेंना घेऊन कणकवली पोलीस गोव्यात दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सिंधुदुर्ग – संतोष परब हल्लाप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांची गुरुवारी साडे पाच तास कसून चौकशी केली. काल नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलीस वेगाने तपासाला लागले आहेत. नितेश राणेंना पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत चौकशी करत आहेत.

आज सकाळी नितेश राणे यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यातून कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता नितेश राणे यांच्या चौकशीला सुरुवात झाली. यावेळी पोलिसांनी नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना सव्वा तास समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांचे वकील संग्राम देसाई हेदेखील उपस्थित होते. चौकशी झाल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास नितेश राणेंना मुंबई-गोवा महामार्गावरून यांना गोव्यातील पेडणे याठिकाणी आणण्यात आले.

दरम्यान, आज कणकवली पोलीस स्थानकात पाच तास चौकशी झाल्यांनतर मुंबई पोलिसांनी नितेश राणे यांना दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास प्रथम सावंतवाडीच्या दिशेने नेले. त्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरून नितेश राणे यांना गोव्यातील पेडणे याठिकाणी आणण्यात आले. चौकशीचा भाग असल्याने त्यांना गोव्यात आणल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नितेश राणेंचा तुरुंगात पुस्तक वाचताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा फोटो जुना असल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणे यांची पोलीस कोठडी उद्या संपत असल्याने उद्या कोर्टात काय होणार? याप्रकरणात आता पुढे काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami