संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने केला ३४४ कोटी रुपयांचा चुराडा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- भाजपने या वर्षाच्या सुरुवातीला पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ३४० कोटी रुपये खर्च केले आहेत.भाजपने सर्वाधिक खर्च उत्तर प्रदेशातमध्ये झालेल्या निवडणूकीत खर्च केला. तर काँग्रेसने याच राज्यांमध्ये प्रचारावर १९४ कोटी रुपयांहून अधिक रूपये खर्च केला. ही माहिती दोन्ही प्रमुख पक्षांच्या निवडणूक खर्चाच्या अहवालात देण्यात आली आहे.
भाजपने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या आणि सार्वजनिक केलेल्या अहवालानुसार, पक्षाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी एकूण ३४० कोटी रुपये खर्च केले. भाजपच्या निवडणूक खर्चाच्या अहवालानुसार, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २२१ कोटी रुपये, मणिपूरमध्ये २३ कोटी रुपये, उत्तराखंडमध्ये ४३.६७ कोटी रुपये, पंजाबमध्ये ३६ कोटी रुपये आणि गोव्यात १९ कोटी रुपये खर्च केले आहेत.तसेच काँग्रेसने दाखल केलेल्या अहवालात वरील पाच राज्यांच्या निवडणुका आणि संबंधित कामांसाठी १९४ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याचे म्हटले आहे. काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणाऱ्या पक्षांनी त्यांचा निवडणूक खर्चाचा अहवाल मुदतीत निवडणूक आयोगासमोर सादर करणे आवश्यक असते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami