नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणत्या ना कोणत्या कारणाने जगभरात चर्चा होते.मोदींची जगभ्रमंतीही नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. मोदींच्या परदेशवारीवर आतापर्यंत सातत्याने टीका होत आली आहे.तरीही जागतिक नेत्यांच्या पंक्तीत बसण्याचा मान पंतप्रधान मोदींनी मिळविला आहे. त्यांनी मागील पाच वर्षांत तर ३६ परदेश दौरे केले असून त्यावर तब्बल २३९ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. अशी अधिकृत माहिती सरकारच्यावतीने नुकतीच राज्यसभेत दिली.यातील सर्वांत जास्त खर्च अमेरिका दौर्यावर झाला आहे.
देशाचे परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांनी माकपचे खासदार यांनी यासंदर्भात राज्यसभेत प्रश्न विचारला होता.त्याला मंत्र्यानी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.त्यानुसार,पंतप्रधान मोदी यांच्या २९ दौर्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे त्यांच्या सोबत होते.परराष्ट्रमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या लेखी उत्तरात ३६ पैकी ३१ दौर्याचाच खर्च दाखविण्यात आला आहे. ३१ दौऱ्याचा खर्च २३९ कोटी ४ लाख ८ हजार ६२५ इतका आहे.यात एकट्या अमेरिका दौर्यावर २३ कोटी २७ लाख ९ हजार रुपये खर्च झाला आहे.पाच वर्षाच्या दौऱ्यातील सर्वात कमी खर्च जपान दौर्यावर यंदाच्या २६ ते २८ सप्टेंबर महिन्यातील २३ लाख ८६ हजार ५२६ रुपये इतका झाला आहे. ३६ मधील ९ दौरे हे एकाचवेळी दोन किंवा अधिक देशांचे आहेत.