संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

पाटण्यात प्रवाशांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत बुडाली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पटणा: -बिहारची राजधानी पाटणा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट शेरपूर घाटाजवळ गंगा नदीत बुडाली आहे. दुसऱ्या किनाऱ्यावर जात असताना ही बोट नदी पात्रात उलटली. यातील ४५ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. तर अजूनही १० प्रवाशी बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही नागरिक रविवारी गंगा नदी पार करुन गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. दिवसभर चारा गोळा करुन हे सर्वजण घरी येत होते. नदी पात्रात मध्यभागी असताना अचानक नदीचा प्रवाह बदलला आणि दोन बोटी एकमेकांना धडकल्या. स्थानिकांनी तात्काळ घटनेची माहिती यंत्रणा आणि पोलिसांपर्यंत पोहोचवली. माहिती मिळताच पोलीस आणि यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami