पाटना – पाटणा येथून प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण केलेल्या स्पाइस जेटच्या विमानाला अचानक आग लागली. त्यानंतर पायलटने विमान सुरक्षितपणे पाटणा विमानतळावर उतरवले. त्यामुळे प्रवासी सुदैवाने वाचले. ही आग कशामुळे लागली त्याचे कारण समजले नाही, असे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाटणा येथून प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाण्यासाठी स्पाइस जेटच्या विमानाने उड्डाण केले. त्यानंतर काही वेळात त्याच्या इंजिनला आग लागली. हा प्रकार लक्षात येताच पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान पाटणा विमानतळावर उतरवले. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे ते सुदैवाने वाचले. आग कशामुळे लागली त्याचे कारण समजले नाही, असे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.