संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

पार्किंग क्षेत्रातील वाहनांवर
पोलिसांकडून ई-चलान जारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर: जम्मूमध्ये वकिलांनी न्यायालयाच्या आवारातील पार्किंग क्षेत्रात आपली वाहने उभी केली असतानाही त्यांना ट्रॅफिक पोलिसांनी ई-चलान जारी केले आहे. याच्या निषेधार्थ न्यायालयाच्या आवारातच वकिलांकडून निदर्शने करण्यात आली होती.
ट्रॅफिक पोलिसांकडून न्यायालयाच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनांना ई-चलान जारी केल्यानंतर जम्मूत वकिलांनी मंगळवारी न्यायालय प्रवेशद्वारावरच ही निदर्शने केली. नियुक्त केलेल्या पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या त्यांच्या वाहनांना ई-चलान जारी केल्याचा आरोप वकिलांकडून ट्रॅफिक पोलिसांवर करत हा निषेध केला आहे. आंदोलकांनी रस्ता रोखून धरण्यात आला. ज्यांच्या निर्देशानुसार कोर्ट पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या वाहनांवर ई-चलान जारी करण्यात आले त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आली. जम्मूत ई-चलन जारी करणे थांबवण्यासाठी वाहतूक अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी देखील करण्यात आली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या